Wednesday, December 5, 2018

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी मदत


जत,(प्रतिनिधी)-
 आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नातून येळदरी (ता. जत) येथील सरपंचाच्या मुलीस उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. येळदरी येथील सरपंच बीराप्पा उत्तरे यांची कन्या आरोही ही कर्करोगाने त्रस्त आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उपचारासाठी आर्थिक मदत गरजेचे होती. त्यांनी आमदार जगताप यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. यावेळी आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत उपचार करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते.

No comments:

Post a Comment