Wednesday, December 5, 2018

संविधानाच्या अवमानकारक पोस्टप्रकरणी शिक्षकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस


जत,(प्रतिनिधी)-
 आटपाडी तालुक्यातील काळाखडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक धोंडिबा औटे यांनी संविधानदिनी संविधानाचा अवमान होईल, असा मजकूर समाजमाध्यमांवर टाकल्याची तक्रार करीत संबंधित शिक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी जि. . मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे.

 फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच आटपाडीचे कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन तक्रार केली, त्यानंतर त्यांनी या प्रकरणी खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. निवेदनात म्हटले आहे की, 25 ते 27 नोव्हेंबरदरम्यान शिक्षक भारतीया व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपजनक मजकूर टाकण्यात आला होता, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment