Saturday, December 1, 2018

आसंगीतुर्क शाळेला चार एलईडी टीव्ही संच


जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा  परिषद शाळा आसंगी तूर्क (जत) या शाळेला ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून चार एलईडी टीव्ही संच दिले आहेत. यामुळे शाळा डिजिटल होण्यास मदत झाली आहे. सरपंच  वंदना सुर्याबा शिंगाडे यानी व ग्रामसेवक ग्रामपंचायत बी.के.  कोकरे, तानाजी वाघे आणि  ग्रामपंचायत सदस्य सिद्धू बसर्गे यांच्या उपस्थितीत नुकताच एका कार्यक्रमाद्वारे 14 व्या वित्त आयोगातून एलईडी टीव्ही त्रेचाळीस इंची चार संच शाळेला देऊ केले.
 यामध्ये या शाळेचे मुख्याध्यापक मनोज खोकले , विलास चिकुर्डेकर , नामदेव जानकर, सुधाकर संग्रामे , विलास मेंडके व संतोष राठोड ,सुनील साळवे, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक माळी व गद्दाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे  पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी , पालक व शिक्षक  मोठ्या संख्येने उपस्थित  होते.  

No comments:

Post a Comment