Saturday, December 29, 2018

इतक्या लवकर आईची भूमिका करेन असे वाटले नव्हते : तन्वी

तन्वी डोग्राने स्टार भारतवरील जीजी माँमध्ये पदार्पण करून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. याला बराच काळ झाला आहे आणि तिने स्वत:ला जिजी माँची भूमिका बजावणारी एक चांगली अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. शो जिजी माँ हे मनोरंजक वळण घेईल आणि बहिणीकडून बायको, कन्या आता शोमध्ये एक आई असेल. तन्वी डोग्राने स्टार भारतवरील जीजी माँमध्ये पदार्पण करून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिने आता मोठा पल्ला गाठला असून, जीजी माँची भूमिका करून स्वत:ला सिद्ध केले आहे.
जीजी माँ हा शो रोचक वळण घेत आहे. बहीण, पत्नी, मुलगी आणि आता तन्वी या शोमध्ये आईची भूमिका करणार आहे. या तरुण आणि गुणी अभिनेत्रीने या शोमध्ये अनेक लूक्स घेतले असून, आता जीजी माँमध्ये गर्भवती दिसून येणार आहे. तन्वी डोग्राची आई लहानपणीच देवाघरी गेली आणि त्यामुळे आईच्या व्यक्तिरेखेमध्ये शिरणे कदाचित आपल्याला कठीण जाईल, असे तिला वाटते. भावनिकदृष्ट्या तिच्यासाठी हे खूपच आव्हानात्मक होते. तन्वी म्हणाली, मला असं वाटलंच नव्हतं की, मला एवढ्या लवकर आईची भूमिका साकारावी लागेल. आईची भूमिका करण्यासाठी जबाबदारी आणि परिपक्वता हवी.माझ्यासाठी आईच्या भूमिकेत शिरणे अधिकच कठीण आहे.

No comments:

Post a Comment