Sunday, December 9, 2018

(युजफूल गॅजेट्स) व्हिसल की-फाइंडर


आजकाल गॅजेट्सचा जमाना आहे. उद्या कदाचित त्यांच्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती असणार आहे. त्यामुळे नवनवीन येणार्या गॅजेट्सची माहिती घेण्याची धडपड आजच्या युवकांची असते. अशाच काही आपल्याला अगदीच उपयोगाच्या गॅजेट्सची माहिती आपण इथे देणार आहोत. अगदी कमी किंमत असलेल्या पण आपल्याला उपयोगाची आहे, अशीच एका गॅजेटची माहिती देत आहोत. त्याचं नाव आहे, व्हिसल की-फाइंडरची! आजकाल माणसाने फार मोठा व्याप करून घेतला आहे

ऑफिसची कामे, घरी आल्यावरही काही ना काही धडपड चाललेली आहे. अशा परिस्थितीत माणसाला विसराळूपणा येऊन चिकटतो. आपल्या गाडीची, घराची चावी अशीच कुठे तरी विसरून जाते. ती कुठे ठेवली आहे, हे आठवतच नाही. अशा वेळेला या व्हिसल की-फाइंडर आपल्या कामाला येतो. या की-फाइंडरला चावी (किल्ली) लावून तुम्ही बिनधास्त राहू शकता. तुम्हाला ती शोधायची असेल तर हा की-फाइंडर चावी कुठे आहे, व्हिसल वाजवून सांगू शकतो. पण यासाठी तुम्हाला एक सोप्पं काम करावं लागेल. तुम्हाला शिट्टी वाजवावी लागेल किंवा टाळी वाजवावी लागेल. जवळपास 1000-1200 हटर्ज अंतरावरील यापैकी कोणताही आवाज ऐकून तुमचे गॅजेट बीपचा आवाज करून तुम्हाला प्रतिसाद देईल. शिवाय यात असलेली लाइटदेखील लागेल.दिवसाबरोबरच रात्रीही हा तुमच्या उपयोगाला येईल. याचा एलएडीच्या स्वरुपातदेखील तुम्हाला वापर करता येईल.याची किंमत फक्त दोनशे रुपये आहे. खिशाला परवडेल, अशी त्याची किंमत आहे.

No comments:

Post a Comment