Saturday, December 1, 2018

थोरात गटाने सत्तेची स्वप्ने बघू नयेत : श्रीकांत माळी


जत,(प्रतिनिधी)-
 शिक्षक बँकेत थोरात गटाची सत्ता येणारच नाही त्यांनी दिवसा स्वप्ने बघू नये वेळ व पैसा वाया घालवू नये असा सबुरीचा सल्ला संचालक श्रीकांत माळी यांनी दिला मागील काळात थोरात गटाकडे सत्ता असताना शिक्षक बँकेत पाय ठेवायला जागा नसताना थोरात गटाने सत्तावीस कर्मचारी भरले. त्या वेळी थोरात गटाने भरलेल्या कर्मचार्यांमुळे बँकेच्या नफ्यावर परिणाम झाला तरीही थोरात गटाने सत्तेवर असताना व्याजदर साडेचौदा टक्के होता.
आता समितीच्या संचालक बारा टक्केवर आणले आहे. सभासद परत सत्ता थोरात गटाकडे देणारच नाही थोरात गटाची एकही संचालक निवडून येणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे. यावेळी भारत क्षिरसागर ,चनबसु चौगुले, मोहन चौगुले, अशोक मुचंडी, बसवराज बीरादार, सीद्धण्णा बीरादार, यशवंत बिरादार, बिराप्पा जोग, विश्वनाथ मेत्री उपस्थित होते.

No comments:

Post a Comment