Friday, December 7, 2018

आमदार, खासदारांच्या नाकर्तेपणामुळे केंद्रीय पथक जत तालुक्यात आले नाही


विक्रम सावंत यांचा आरोप
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात गेले वर्षभर पावसाचा पत्ता नाही. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. जत तालुक्यात भीषण दुष्काळ पडला असून या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जत तालुक्यात येणार होते; मात्र सोलापूर जिल्ह्यातून जत तालुक्याच्या सीमाभागातून ते आटपाडीला गेले. त्यामुळे जत तालुक्यातील भयाण परिस्थिती केंद्रीय पथकाला पाहता आली नाही. भाजपचे आमदार व खासदार यांच्या नाकर्तेपणामुळे पथक जत तालुक्यात आले नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.

 यावेळी बोलताना श्री. सावंत म्हणाले, शासनाने दीड महिन्यापूर्वी दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र दुष्काळाच्या कोणत्याही सोयी-सवलती या तालुक्यात ि द ल े ल् य ा नाहीत, तालुक्यातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहे. तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींनी टँकरसाठी प्रस्ताव दिले असतानाही प्रशासन मात्र टँकर द्यायला तयार नाही. याबाबत आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला असून प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत.
दुष्काळामुळे अनेक लोक ऊसतोडीला जात आहेत. तुरची-बबलेश्वर योजनेचे पाणी जत तालुक्याच्या पूर्वभागातील 42 गावाला मिळाले पाहिजे, अशी मागणी पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा आम्ही जत व गुड्डापुर येथे शेतकरी मेळावा घेऊन केली होती. मात्र गेल्या साडेचार वर्षांपासून सत्ताधारी आमदार व त्यांचे पुढारी मूग गिळून गप्प आहेत. मात्र आता पुन्हा एकदा आम्हीच पाणी आणणार, अशी भीमगर्जना करत आहेत, याचे आश्चर्य वाटते. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पूर्वभागातील 42 गावासाठी कर्नाटकातील पाणी देण्याची मागणी केल्याचे सांगितले. या पत्रकार बैठकीत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार म्हणाले, जत तालुक्याचे आमदारांनीही एकदाही विधानसभेत तोंङ उघङले नाही. केवळ जनतेचीदिशाभूल करण्याचा उद्योग त्यांनी बंद करावा

No comments:

Post a Comment