Tuesday, December 11, 2018

‘कलाकार मानधनाचे प्रस्ताव सादर करा’


सांगली,(प्रतिनिधी)-
 सन 2018-19 ते 2020-21 या तीन वर्षाकरिता जिल्हास्तरीय वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन समितीची निवड केली आहे. सांगली जिल्ह्यातील पात्र व इच्छुक वृध्द साहित्यिक व कलाकारांनी सन 2018- 19 या वर्षाकरिता कलाकार मानधनाचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत 31 डिसेंबर पर्यंत समाजकल्याण विभाग कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment