Monday, December 3, 2018

कत्तलखान्याकडे गायी नेणारा टेंपो पोलिसांनी घेतला ताब्यात

जत,(प्रतिनिधी)-
सांगोला ते  विजापूर ( कर्नाटक ) गा़यी भरून घेवून कत्तलखान्याकडे चाललेला  टेम्पो क्रमांक एम एच १३/ आर ३०१३ सोलंनकर  चौक जत येथे पकडून टेंम्पोतील दहा गायी व बैलांची  सुटका करण्यात आली आहे.
याप्रकरणी तिन जणांच्या विरोधात जत पोलिसात  गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. बाजार  भावानुसार या गायी आणि बैलांची किमंत सुमारे एक लाख पन्नास हजार रूपये इतकी आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी की,पैंगबर अमिनसाब शेख ( वय ४० रा.विजापूर नाका दोन नंबर झोपडपट्टी , चांदतारा मसिद जवळ सोलापूर ) , सैदूभाई दारुवाले  ( वय ३८ रा.नई जिंदगी ,सोलापूर ) , अलताफ उर्फ अफताफ खुरेशी ( वय ४२ रा.विजापूर वेस सोलापूर ) हे तिघेजण सांगोला ( जि.सोलापूर ) येथील जनावरे बाजारात खरेदी केलेल्या पाच  गायी व पाच बैल  घेऊन टेम्पो क्र.एमएच- १३ आर- ३०१३  मधून  शेगांव - जत - विजापूर असे जत असताना  कांहीं  सामाजिक कार्यकर्त्यांनी याची माहिती जत पोलीसांना दिली होती.पोलीस पथकांने तात्काळ घटनास्थंळी जावून  टेम्पोची तपासणी केली.  त्यानंतर  टेंम्पोतील बैल व  गायीची सुटका केली. हा  टेंम्पो विजापूर येथील कत्तलखान्याकडे घेवून जात होतो असा जबाब वरील तिन संशयित आरोपींनी पोलिसांना दिला आहे .पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment