Thursday, December 13, 2018

शिक्षक भरती जानेवारीपासून?

जत,(प्रतिनिधी)-
शिक्षक भरती साठी राज्य सरकार अनुकूल झाल्या च्या बातम्या यायला लागल्या असून एका न्यूज वाहिनीच्या बातमीनुसार शिक्षक भरती जानेवारी पासून सुरू होईल , अशी शक्यता व्यक्त केली आहे.  आता मेगा भरतीपाठोपाठ शिक्षक भरती होणार असल्याने बेरोजगार शिक्षकांमध्ये नक्कीच समाधानाचे वातावरण दिसण्याची शक्यता आहे.

 लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने कसल्याही परिस्थितीत आचारसंहिता लागण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी  24 हजार शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदं भरली जाणार आहेत. या शिक्षकांच्या प्रस्तावित 24 हजार जागांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के जागा राखीव असतील असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितलं होतं.
 आता ही भरती जानेवारी महिन्यात सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, 24 हजार शिक्षक भरती पुढच्या महिन्यानंतर होईल आणि त्यातही मराठ्यांना आरक्षण मिळेल. म्हणजेच 24 हजार शिक्षक भरतींमध्ये जवळपास 3 हजार 840 जागा या मराठ्यांसाठी राखीव असतील.
लवकरच शिक्षक भरती होणार आहे, त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार का, असा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी, मराठा समाजाला शिक्षक भरतीत  16 टक्के म्हणजेच 3 हजार 840 जागा राखीव असतील असं सांगितलं होतं.
दरम्यान,राज्यातल्या तीस हजार शिक्षकांना अनुदान मिळाले आहे. 20 टक्के अनुदान घेऊन अनेक शिक्षक आता या प्रक्रियेत आले आहेत.

No comments:

Post a Comment