Thursday, December 6, 2018

भौतिक साधनातून मिळणारा आनंद क्षणभंगूर:गणेश शिंदे

ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमाला पुष्प दुसरे
जत,(प्रतिनिधी)-
भौतिक साधनांतून मिळणारे सुख चिरकाल टिकणारे नसून साधनेचा मार्गच खरा जीवनाचा आनंद देतोअसे प्रतिपादन गणेश शिंदे (पुणे)यांनी जत येथील ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना केले.

जत येथील रामराव विद्यामंदिरच्या पटांगणावर पार पडलेल्या 24 व्या व्याख्यानमालेत जीवन सुंदर आहे या विषयावर श्रीशिंदे बोलत होते म्हणालेजीवन जगताना ते सुंदर होण्यासाठी देण्याची दानत आपल्यात असली पाहिजे.आपले सुख,दु:ख हे आपलेच असले पाहिजे.आपण दुसर्याच्या सुख-दु:खातून सुखाचे मोजमाप करत असतोहे चुकीचे असून दुसर्याला आनंदी पाहायला शिकले पाहिजे.यासाठी दान महत्त्वाचे आहे.
सुखी जीवनासाठी मुलांसह सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजेत्यांच्या दु:खात सहभागी झाले पाहिजे.प्रत्येकाकडे ईश्वराने एक श्रीमंती दिली आहे.कला दिली आहेती ओळखून त्याचा विकास केला पाहिजेया श्रीमंत कलेने जग सुंदर करता येतेअसेही श्रीशिंदे म्हणाले.
प्रारंभी स्वागत प्राचार्य वसंत बोराडे यांनी केले.यावेळी मराठा मंदिर संस्थेचे सरचिटणीस दीपक देशमुखमल्लिकार्जून मोगलेप्रकाश जमदाडे,प्रभाकर जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment