Friday, December 7, 2018

बिळूरमध्ये सुरू होणार ज्युनिअर कॉलेज

जत,(प्रतिनिधी)-
बिळूर (ता.जत) येथे पहिल्यांदाच बिळूर एज्युकेशन फौंडेशन या शिक्षण संस्थेच्यावतीने अकरावी,बाराबी ज्युनिअर कॉलेज सुरू होत आहे. बिळूर इंग्लिश गुरुकुल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजला सायन्स,कला आणि वाणिज्य या सर्व शाखांना मंजुरी मिळाली आहे.

त्याचबरोबर पहिली ते दहावी इंग्रजी माध्यमाचीही शाळा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.
बिळूरजवळ दोन एकर जमीन खरेदी करण्यात आली असून 14 डिसेंबर रोजी इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. जून 2019 पासून इंग्रजी माध्यमाची शाळा आणि कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. गावातील डॉक्टर आणि उद्योजक यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. बिळूर गाव आर्थिकदृष्ट्या संपन्न असून शिक्षणासाठी येथील गरीब विद्यार्थ्यांना जत किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे. याचा विचार करून डॉ. राजू जीवण्णावर, उद्योजक बसाप्पा कोळी, श्रीकांत करोली, विजय कोटगोंड, गुरनिंगा प्रधाने, पंचाक्षरी पट्टणशेट्टी, डॉ. दयानंद करेण्णावर, रमेश करेण्णावर, रामाण्णा जीवण्णावर, बसाप्पा जाबगोंड, अप्पासाहेब पाटील, बाळासाहेब नणदीकर, बसवराज धोडमाळ आदी मंडळींनी पुढाकार घेऊन शाळा-कॉलेज सुरू करण्याचे ठरवले आहे.
शिक्षणाशिवाय पर्याय नाही,याशिवाय गावाचा विकास नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची आणि कॉलेजची गरज आहे. मे 2019 पर्यंत बांधकाम सुरू करून पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment