Sunday, December 2, 2018

डोक्यात दगड पडून एक ठार


जत,(प्रतिनिधी)-
अचकनहळ्ळी (ता. जत) गावात विहिरीतील कचरा काढत असताना बकेटमधील दगड डोक्यात पडून एकाचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत श्रीधर पाटील (वय 38, रा. बनाळी) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी 1.30 वाजता ही घटना घडली असून यात आणखी तिघे जखमी झाले आहेत. याबाबत जत पोलिस ठाण्यात धुंडय्या स्वामी यांनी फिर्याद दिली आहे. 

  सचिन पाटील, नानासो सावंत, ईश्वर साळुंखे अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. अधिक माहिती अशी, अचकनहळ्ळी गावात मनोज शिंदे यांच्या विहिरीतील कचरा काढण्याचे काम सुरू होते. दुपारी 1.30 वाजता कचर्यानी भरलेल्या बकेटमधील दगड खाली पडून तो सरळ चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यात पडला. तर इतर तिघांच्या अंगावर ही दगड कोसळल्याने जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जत ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. याची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली असून याचा तपास उपनिरीक्षक आप्पासो कत्ते करत आहेत.

No comments:

Post a Comment