Tuesday, December 4, 2018

डाळिंब बागांसाठी अनुदान देण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
 पाऊस नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जत तालुक्यात अशा परिस्थितीत शेतकर्यांनी टँकरने पाणी आणून जगवल्या आहेत. अशा शेतकर्यांना आर्थिक हातभाराची गरज आहे. डाळिंब बागांना नेटसाठी 50 टक्के अनुदान मिळावे, अशी मागणी होत आहे.

 सध्या शेतकरी सनसेटचा त्रास होऊ नये म्हणून डाळिंब फळांना ऊन लागू नये, यासाठी कागदाने किंवा झाडावर साडी व कपडे अंथरून फळाचे संरक्षण करीत आहे. आलेली डाळिंब फळे कडक उन्हाच्या तीव्रतेने फुटून जाण्याची भीती असते. यासाठी डाळिंब बागांना कायमस्वरूपी नेट लावून कडेला लोखडी अँगल लावण्यास डाळिंब बागांचे कायमस्वरूपी संरक्षण होईल. यासाठी शासनांकडे प्रस्ताव पाठवून या खर्चाच्या निम्मे अनुदान शेतकर्यांना शासनाकडून मिळायला हवे, अशी मागणी होत आहे. दुष्काळी भागातील शेतकरी डाळिंब भागातील झाडांना लागलेल्या फळांवर आच्छादन घालत आहेत. सध्या द्राक्षबागायतदार साड्या खरेदी करून ते डाळिंब झाडांवर अंथरत आहेत.

No comments:

Post a Comment