Sunday, December 9, 2018

अनुकंपा नोकरभरतीसाठी सोमवारी उपोषण


जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा परिषदेकडील नोकरभरती प्रक्रिया सुरू झाली असून शासनाने पहिल्यांदा अनुकंपा तत्वाखाली भरती करावी, या मागणीसाठी सोमवार दि. 10 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाजसेवा संस्थेच्यावतीने देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विश्रामबाग पोलिस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षात अनुकंपा तत्त्वाखाली सांगली जिल्हा परिषदेकडे भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे.
सांगली जिल्ह्यात अनुकंपा उमेदवारांची संख्या 139 इतकी आहे. त्यामुळे तात्काळ अनुकंपा तत्त्वावरील भरती करून न्याय द्यावा, यासाठी सोमवारी सकाळपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य धनगर समाजसेवा संस्था करीत आहे.

No comments:

Post a Comment