Wednesday, December 12, 2018

आडव्याप्पा घेरडे यांची जत पंचायत समितीच्या उपसभापती निवड

(जत पं. स. उपसभापती आडव्याप्पा घेरडे यांचा सत्कार आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.)
जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीच्या उपसभापती ऍड. आडव्याप्पा घेरडे यांची आज बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. यासाठी पंचायत समितीची विशेष सभा बोलावण्यात आली होती.

यापूर्वीच्या उपसभापती शिवाजी शिंदे यांनी त्यांची मुदत संपल्याने आठ दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त जागेसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सचिन पाटील तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अर्चना वाघमळे यांनी काम पाहिले. या निवडीसाठी अन्य कोणी उमेदवारी दाखल न केल्याने निवड प्रक्रियेवर दुपारी एक नंतर ऍड. आडव्याप्पा घेरडे यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी घेरडे यांचा सत्कार करण्यात आला. वकील संघटनेच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार विलासराव जगताप, जन सुराज्य पक्षाचे नेते बसवराज पाटील, शिक्षण व अर्थ सभापती तम्मनगौडा रवीपाटील,  पं. स. सभापती सुशीला तावंशी,डॉ. रवींद्र आरळी, सुभाष पाटील, उमेश सावंत यांच्यासह जि. प. व पं. स. सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment