Wednesday, December 5, 2018

गुड्डापूरच्या दानम्मादेवी यात्रेस आजपासून प्रारंभ


जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र व कर्नाटक भक्तांचे प्रसिद्ध आराध्य दैवत गुड्डापूर येथील दानाम्मा देवीच्या कार्तिक महिन्याच्या यात्रेस आजपासून (गुरुवार) सुरुवात होत असल्याने यात्रा कमिटीने तयारी पूर्ण केल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश गणी यांनी सांगितले.

यावेळी सेक्रेटरी विठ्ठल पुजारी, संचालक चंद्रशेखर गोब्बी, अशोक पुजारी, बाळासाहेब गाडवे, गुरुपाद पुजारी, शिवलिंगप्पा ममदापुरे, सिद्धया स्वामी उपस्थित होते. गुड्डापूर येथील दानाम्मादेवीची यात्रा 5 ते 8 डिसेंबर दरम्यान होत आहे. आज सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत पालखी उत्सव कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम जतचे आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून खासदार संजय पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, दि. 7 रोजी रथोत्सव कार्यक्रम आयोजित केला असून कर्नाटकचे आरोग्य मंत्री शिवानंद पाटील, महसूल मंत्री राजशेखर पाटील यांच्या उपस्थितीत, आमदार आनंद न्यामगौडा जमखंडी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

No comments:

Post a Comment