Tuesday, December 4, 2018

फॅट मोजणी मशीन लंपास

जत,(प्रतिनिधी)-
कुंभारी ( ता.जत )  येथील बंद घराचे कुलूप व कडी- कोयंडा कटावनीने तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात ठेवलेले तीस हजार रुपये किंमतीचे एक इको मिल्क फॅट मोजणी मशीन लंपास केले आहे . ही घटना सोमवारी रात्री घडली . याप्रकरणी दुध संकलन केंद्र चालक नाथा वसंत पाटील यांनी आज जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की,कुंभारी ते डफळापुर रस्त्यावर कुंभारी पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील कौलापूरे वस्ती येथील भैराप्पा हरी कदम यांच्या घरातील एका खोलीत नाथा पाटील यांचे खाजगी दुध संकलन केंद्र आहे. दैनंदिन काम झाल्यानंतर सोमवारी रात्री या खोलीत त्यांनी इको मिल्क फँट मोजणी मशीन ठेवले होते . अज्ञात चोरट्यानी या खोलीचे कुलूप तोडून खोलीतील मशीन लंपास केले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय माने करत आहेत.

No comments:

Post a Comment