Saturday, December 1, 2018

आंबेडकर, शाहू, फुले रूग्णालय लवकरच सेवेत : विश्‍वनाथ मिरजकर


जत,(प्रतिनिधी)-
 प्राथमिक शिक्षक समिती व शिक्षक बँक यांच्या पुढाकाराने होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रूग्णालय मर्यादित सांगलीचे सभासद वाढीवर भर देणार असल्याचे अध्यक्ष शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर यांनी सांगितले. लवकरच हे रूग्णालय नागरिकांच्या सेवेत उपलब्ध असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    मिरजकर म्हणाले, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सल्लयाने आपण गोर गरीब रूग्णांची सेवा करण्यासाठी सहकारी रूग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला असून, रूग्णालयाचे सुमारे पाचशेपेक्षा जास्त सभासद आणि सुमारे 53 लाख रूपयांचे भागभांडवल जमा आहे. यापुढील काळात सभासदांची संख्या वाढवून लवकरच हे रूग्णालय गोरगरीबांच्या सेवेत असणार असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रूग्णालय मर्यादित सांगलीची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक येथील शिक्षक भवन मध्ये संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. सभेमध्ये विश्वनाथ मिरजकर यांची पुन्हा अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली.
सचिव शशिकांत भागवत यांनी नोटीस वाचन केले. संस्थेच्या उपविधीची नोंद करून ताळेबंद पत्रके सादर केली. त्याला सर्व सदस्यांनी मंजरी दिली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रूग्णालय मर्यादित सांगलीचे उपाध्यक्ष किरण गायकवाड, किरणराव पाटील, सयाजीराव पाटील, दयानंद मोरे, बाबासाहेब लाड, शिक्षक बँकेचे अध्यक्ष रमेश पाटील, उपाध्यक्ष राजाराम सावंत, जिल्हा उपनिबंक कार्यालयाचे प्रतिनिधी खराडे आदींसह बँक आणि रूग्णालयाचे संचालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment