Tuesday, December 4, 2018

सांगलीतील हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय उघडकीस


जीसॅट-11 उपग्रह आज प्रक्षेपित
नवी दिल्ली: भारताचा आतापर्यंतचा सर्वाधिक वजनदार उपग्रह ठरलेल्या जीसॅट -11 चे आज (बुधवार) पहाटे युरोपियन अंतराळ संस्था फे्रंच गुएना येथील अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण होत आहे. भारतीय अंतराळ क्षेत्रातील हे एक मोठे पाऊल असून, यामुळे देशात इंटरनेट क्रांती होईल, असे मानले जात आहे.

भाजपच्या कुंभकर्णाला जागे करत राहणार
मुंबई,(प्रतिनिधी)- निवडणुका आल्या की, ‘मंदिर वही बनायेंगेच्या घोषणा द्यायच्या व सत्ता आली की गप्प बसायचे असे धोरण असलेल्यांना आता या मुद्द्यावर प्रचार करण्याचा अधिकार उरलेला नाही. मात्र आम्ही हा मुद्दा सोडणार नाही, राममंदिराच्या मुद्द्यावर झोपलेल्या या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी 24 डिसेंबरला पंढरपूर येथे आपण सभा घेणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केल

सांगलीतील हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय उघडकीस
सांगली,(प्रतिनिधी)- पोलिसांच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाने मंगळवारी एका उच्चभ्रू वस्तीत अलिशान अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेला हायप्रोफाईल वेश्याव्यसाय उघडकीस आणला. सांगली - माधवनगर रस्त्यावरील घनःश्यामनगरमधील वरदविश्व अपार्टमेंटमधील तिसर्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये हा व्यवसाय चालविणार्या रेखा पांडुरंग मोटे (वय 30) या महिलेला अटक करून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आल्याची माहिती कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. घनःश्यामनगरमधील एका अपार्टमेंटमध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

राज्यात मेगाभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात
 मुंबई : राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 72 हजार पदांची भरती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा होण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांनी मंगळवारी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा होणार असून पुढच्या आठवड्यात जाहिराती निघणार आहेत. प्रत्येक विभागनिहाय भरती होणार असून प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील सुमारे 72 हजार पदांच्या भरती कार्यवाही सुरू झाली आहे.

सांगलीत 27 दुचाकींवर कारवाई
सांगली,(प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मंगळवारी अचानक पुष्पराज चौकात ठाण मांडून गोंगाट करत सुसाट सुटणार्या बुलेट दुचाकींवर कारवाईला सुरुवात केली. वाहनरचनेत मनमानीपणे बदल करुन गोंगाट निर्माण करणारे आवाज काढत जाण्याचे फॅड वाढत निघाले आहे. याचा इतर सर्वसामान्यांना, रुग्णांना विनाकारण मनःस्ताप होतो. याची दखल घेऊन मंगळवारी काही तासात 27 दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

नोकरभरतीला गती, शासनाने मागवली रिक्त जागांची माहिती
सांगली,(प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर लगेचच शासनाने नोकरभरतीची हालचाल सुरू केली असुन जिल्हा परिषदेकडील डिसेंबर 2018 पर्यंत रिक्त होणार्या पदांची माहीती मागवली आहे. मात्र ही माहीती केवळ 13 संवर्गातील मागवली आहे, मागील वेळी भरतीची तयारी करताना 17 संवर्गातील माहिती मागवली होती, यावेळी मात्र तीन संवर्ग वगळले आहेत.

No comments:

Post a Comment