Sunday, December 9, 2018

सरकारने दिली दुष्काळग्रस्तांच्या वीज बिलात सवलत


जत,(प्रतिनिधी)-
 राज्यातील सरकारने दुष्काळग्रस्तांच्या समस्या लक्षात घेऊन दुष्काळग्रस्तांची वीज बिलात सवलत दिली आहे. संपूर्ण वीज बील माफ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र इलेक्ट्रिकल बोर्ड च्या संचालक व भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी दिली. जत येथे तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे अधिकारी व ग्राहकांची बैठक आयोजित केली होती, यावेळी त्या बोलत होत्या.

जत व संख उपविभागीय कार्यालयाच्या आधारित असलेल्या अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी केळकर म्हणाल्या की, जत तालुक्यात ट्रान्सफॉर्मरची समस्या मोठी आहे त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, हे टाळण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ट्रांसफार्मर दुरुस्ती केंद्र करण्यासाठी प्रयत्न करणार असून तालुक्यात पूर्ण क्षमतेने आणि अखंडित वीज देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी नव्या योजना अमलात आणले आहेत. प्रामुख्याने शेतकर्यांना 24 तास वीजपुरवठा देणे आवश्यक आहे यासाठी प्रत्येक शेतकर्याला स्वतंत्र ट्रांसफार्मर बसविण्यात येणार आहेत. याचे सर्वे सुरू आहे ही योजना सुरू झाल्यानंतर शेतकर्यांच्या सर्व समस्या पूर्ण होतील.
 आमदार विलासराव जगताप म्हणाले, येळवी सह परिसरातील 11 गावे जत कार्यालयात जोडण्याची गरज आहे. या गावांना संख येथे जाण्यासाठी प्रचंड त्रास होत असून आम्ही अनेक वेळा ऊर्जामंत्र्यांना पत्रे दिली आहेत . या गावांची दखल घेऊन तातडीने जत येथे ही गावे जोडावीत यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावर नीता केळकर यांनी उर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांची भेट घेणार असून यासाठी विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. या आढावा बैठकीत बोलताना विक्रम ढोणे यांनी जत शहरातील पोल व तारा धोकादायक बनले असून नगरपालिकेचा मनमानी कारभार करीत आहे. वीज वितरणाची परवाने न घेता कुठेही पोल उभे केले आहेत त्यामुळे अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत. यावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ढोणे यांनी केली.
या बैठकीला नगरसेवक उमेश सावंत, लता डफळे, शिक्षण सभापती तम्मनगौडा रविपाटील,डॉ. रवींद्र आरळी, पं.. सभापती सुशीला तावंशी, माजी सभापती मंगलताई जमदाडे, प्रभाकर जाधव, विजय ताड, प्रकाश माने, संजय सावंत उमेश सावंत, मनोज जगताप, विष्णू चव्हाण, आप्पासाहेब नामद, चंद्रकांत गुडोडगी,संजय तेली, संतोष मोठे, सोमनिंग बोरामणी आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment