Tuesday, January 8, 2019

राज्यात कृषिसेवकांच्या 1416 पदांची भरती

25 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागवले
जत,( प्रतिनिधी)-
राज्यातील 8 विभागांत कृषी सहायकाची 1 हजार 416 रिक्‍त पदे कृषिसेवक म्हणून निश्‍चित वेतनावर सरळ सेवेने भरण्यासाठी त्या त्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. कृषी विभागातील कृषिसेवकांची अलीकडील काही वर्षातील ही मोठी भरती आहे.

ऑनलाइन अर्ज 5 जानेवारीपासून स्वीकारण्यात येत असून 25 जानेवारी 2019 पर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी निश्‍चित करण्यात आलेला आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत, त्यांचे प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेण्याचा कार्यक्रम तसेच ऑनलाइन परीक्षेचा दिनांक महापरीक्षा पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे. विभागीय स्थिती पाहता पुणे विभागात 314, ठाणे 124, नाशिक 72, कोल्हापूर 97, औरंगाबाद 112, लातूर 169, अमरावती 279 आणि नागपूर विभागात 249 मिळून एकूण 1 हजार 416 कृषिसेवकांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
रिक्त पदांच्या आरक्षणासंदर्भातील व इतर तपशिलाबाबत www.mahapariksha.gov.in व कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्यामध्ये आवश्यक तपशील असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment