Saturday, January 12, 2019

अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल 20 जानेवारीपासून


फॅशनवर मिळणार 80 टक्के सूट
सांगली,(प्रतिनिधी)-
ॅमेझॉनने आपल्या ग्रेट इंडियन सेलची घोषणा केली आहे. ग्रेट इंडियन सेल 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि तो 23 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्राइम सभासद 19 जानेवारी दुपारी 12 वाजल्यापासून या सेलचा लाभ घेऊ शकतील. सेलमध्ये एचडीएफसीच्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इएमआयवर 10 टक्के इन्स्टंट सूट मिळणार आहे.
ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये 10 कोटींहून अधिक उत्पादने नो कॉस्ट इएमआयवर उपलब्ध आहेत. सेलदरम्यान नवीन ग्राहक पहिल्या ऑर्डरवर अॅमेझॉन मोफत घरपोच सेवा देणार आहे. सेलमध्ये फॅशन प्रकारात 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. पुरुषांच्या फॅशन प्रकारात नामांकित ब्रँडच्या 25,000 हजारांहून अधिक उत्पादनांवर ऑफर मिळणार आहे. तर महिलांच्या फॅशन कॅटेगरीत 2000 हून अधिक उत्पादने विकत घेता येतील. याशिवाय 30,000 हून अधिक उत्पादनांवर कमीत कमी 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. यात बॅग, पाकिटे आणि अन्य सामानाचा समावेश आहे. भारतात अॅमेझॉनचे प्राइम वार्षिक सभासदत्व 999 रुपये आहे.No comments:

Post a Comment