Friday, January 4, 2019

बसर्गीमध्ये दलितवस्ती साठी 30 लाखाचा निधी मंजूर


जत,(प्रतिनिधी)-
मागासवर्गीय वस्तींसाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 2018-19 या वर्षांसाठी सुमारे 30  लाख रुपये निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच विकासकामांना सुरुवात होईल, असे बसर्गीचे उपसरपंच किशोर बामणे यांनी दिली.

   जत पंचायत समितीच्या सभापती सौ सुशीला तांवशी यांच्या माध्यमातून बसर्गीमधील श्री संत रोहिदास नगर येथे सिमेंट काँक्रीटचे रस्ते , पेविंग ब्लॉक तसेच गटार इत्यादी कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे.
आंबेडकरनगरमध्ये उंच आरसीसी पाण्याची टाकी व पाईपलाईन असे काम होणार आहे. दिनांक 2 जानेवारी 2019 ला जिल्हापरिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.
  बसर्गी मध्ये दोन्ही दलित वस्ती मध्ये पायाभूत सुविधांचा अभाव होता. याचा विचार करून बसर्गी ग्रामपंचतीचे उपसरपंच किशोर बामणे व ग्रामसेवक श्री. खरमाटे यांनी जेष्ठ नेते शिवाप्पा तावंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करून जत पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद सांगलीला दिला होता.
जत पंचायत समितीच्या सभापती सौ. सुशीला तावंशी व उपसरपंच किशोर बामणे यांच्या विशेष प्रयत्नातून गावातील विविध विकास कामासाठी आतापर्यंत सुमारे 50 लाख रुपयांचा  निधी मंजूर करून आणला आहे.

No comments:

Post a Comment