Tuesday, January 8, 2019

जिल्ह्यात 30 कोटींचा सूक्ष्म सिंचन आराखडा: राजेंद्र साबळे


सांगली,(प्रतिनिधी)-
 पाण्याचा योग्य वापर व्हावा, या उद्देशाने जिल्ह्याचे जास्तीत - जास्त क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुमारे 30 कोटी रुपयाचा सूक्ष्म सिंचन आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 जिल्ह्यात यंदा अपुरा पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळाची स्थिती आहे. पाणीटंचाई असून कमी पाण्यात चांगले उत्पादन येण्यासाठी सूक्ष्म सिंचन जास्तीत-जास्त करण्यावर प्रशासनाचा प्रयत्न आहे. पाऊस कमी झाला असला तरी टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ आणि आरफळ योजनेमुळे पाणी योजनांमुळे दिलासा मिळाला आहे. या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्रात ठिबक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या वर्षासाठी 30 कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
आतापर्यंत 6 हजार 600 शेतकर्यांचे अर्ज आले आहेत. द्राक्षासाठी प्रतिहेक्टरी सरासरी 24 हजार, डाळिंबासाठी 23 हजार अनुदान शेतकर्यांना देण्यात येणार आहेत. मोठ्या शेतकर्यांना 45 टक्के; तर अल्पभूधारक आणि मागासवर्गीय शेतकर्यांना 55 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी 13 हजार शेतकर्यांना 28 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. त्याचा लाभार्थींनी लाभ घेतला.

No comments:

Post a Comment