Tuesday, January 1, 2019

प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर 62 हजारांचे कर्ज


जत,(प्रतिनिधी)-
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल 62 हजारांपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. नुकतेच अर्थ मंत्रालयाने सरकारवर असलेल्या कर्जासंबंधीचा तिमाही अहवाल दिला आहे. त्यानुसार सप्टेंबरच्या शेवटपर्यंत सरकारवरील कर्ज वाढून 82 लाख कोटींवर पोहोचले आहे. त्यामुळे देशातील 134 कोटी जनतेचा विचार केल्यास प्रत्येक देशातील नागरिकांवर जवळपास 62 हजार कोटींचे कर्ज आहे.

या अहवालानुसार गतवर्षी जूनपर्यंत सरकारवर हे कर्ज 79.8 लाख कोटी होते. त्यावेळेस प्रत्येक भारतीयावर 59 हजार 552 रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे केवळ तीन महिन्यात तुमच्यावरील कर्जात 2448 रुपयांची वाढ झाली आहे. तर सरकारवर तीन महिन्यात 2.2 लाख कोटींचे कर्ज वाढले आहे. कच्च्या तेलांच्या किमतीत झालेली वाढ हे देशावरील कर्ज वाढण्याचे मूळ कारण आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयांची झालेली घसरण आणि अमेरिकी फेड-भारतीय रिझर्व बँकांद्वारे व्याजदरांत झालेली वाढ, हेही या कर्जवाढीचे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment