Sunday, January 6, 2019

सोन्याची खरेदी करताय?


सध्या सोन्याचे भाव कमी असल्याने ग्राहकांची चांदी होतेय. पण, सोनं खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घेणंही गरजेचं आहे. सोनं खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ते जाणून घेऊ या.. कॅरेक्टवरून सोन्याची शुद्धता ठरते. २४ कॅरेट सोनं सर्वात शुद्ध असतं. २४ कॅरेटमध्ये ९९ टक्के सोनं असतं. सोनं हा तसा मऊ धातू. नाणी घडवण्यासाठी त्याचा वापर होतो. पण, सोन्याचे दागिने घडवणं थोडं कठीण पडत असल्याने त्यात इतर धातूंचं मिर्शण केलं जातं. त्यामुळेच २२ कॅरेट सोन्यात दागिने घडवले जातात.

 यात ९१.६ टक्के सोनं असतं. हिरे किंवा इतर मौल्यवान धातू जडवलेले दागिने १८ कॅरेट सोन्यात बनतात. 
सोन्याची नीट पारख करून घ्या. हॉलमार्कवाले दागिने शुद्ध मानले जातात. त्यामुळे दागिने घडवताना सोनं हॉलमार्क प्रमाणित असल्याची खात्री करून घ्या. सोन्याच्या दराबद्दल जाणून घ्या. वर्तमानपत्रामध्ये सोन्या-चांदीचे दर दिलेले असतात. इंटरनेटवरही याची माहिती असते. सोन्याच्या चढत्या आणि घसरत्या दरांबद्दलही जाणून घ्या. दागिने घडवताना घडणावळीचं शुल्क आकारलं जातं. अतिरिक्त शुल्क तर आकारलं जात नाही ना, याकडे लक्ष द्या. जुना दागिना देऊन नवा खरेदी करण्याच्या अनेक योजना नजरेत येतात. मात्र, भुलथापांना बळी न पडता शुद्धतेबाबत कोणतीही तडजोड करू नका. उगाचच अतिरिक्त शुल्क देऊन तुमचं बजेट वाढवून ठेऊ नका. शक्यतो विश्‍वासातल्या सोनाराकडूनच सोनं खरेदी करा. पक्की पावती घ्या.

No comments:

Post a Comment