Monday, January 7, 2019

दारूडयांसाठी खूशखबर

तीन हजार लोकसंख्येच्या गावांतही आता दारू दुकाने
जत,(प्रतिनिधी)-
 आपले राज्य सरकार दारुडयांची सोय करताना दारूचे दुकान सुरू करण्यासाठी लागणाऱ्या लोकसंख्येचा आकडा आता पाच हजारावरून तीन हजार केला आहे. त्यामुळे छोट्या गावांमध्येसुद्धा दारूची सोय होणार आहे. अंदाजित आकड्यानुसार राज्यात आणखी 20 ते 25 टक्के दारूची दुकाने सुरू होतील. यामुळे आजूबाजूच्या छोट्या लोकसंख्येच्या गावांतील तळीराम लोकांची चांगलीच सोय होणार आहे.

   आपल्या राज्य सरकारने सुरुवातीला पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावातच दारूची दुकाने  सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशात आता सुधारणा करण्यात आली असून  आता तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावांत दारू दुकाने सुरू करण्याचा परवाना  गृहविभागाने दिला आहे.
   सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या 500 मीटर आतील सर्व दारू दुकाने आणि बीअर बार,परमिट रूम बंद केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानेच शहरातून जाणार्‍या महामार्गावरील दारू दुकाने  सुरू झाली. ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जाणार्‍या महामार्गांवरील दुकाने  सुरू करायची की नाहीत, याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी सूचना न्यायालयाने केली होती. त्यानुसार  शासनाने पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रा. पं. एमआयडीसी क्षेत्र, ज्या ग्रामपंचायतींचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला आहे; तसेच केंद्र किंवा राज्य सरकारने घोषित पर्यटनस्थळ दारू दुकाने  सुरू केली होती. या निर्णयाविरोधात दारू दुकान चालकांनी सरकारकडे लोकसंख्येची अट रद्द करा, अशी मागणी लावून धरली होती. राज्याच्या गृहविभागाने ज्या ग्रामपंचायतींची 2011 च्या जनगणनेनुसार तीन हजार लोकसंख्या आहे; तसेच महापालिकेच्या हद्दीपासून तीन किलोमीटर व नगरपालिका, नगरपंचायत हद्दीपासून एक कि. मी. पर्यंतच्या मार्गावरील मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.

No comments:

Post a Comment