Sunday, January 6, 2019

बेकायदेशीर बांधकामे आवरा


जत,( प्रतिनिधी)-
ग्रामीण भागाचा विकास शहरी भागाप्रमाणे होऊ लागला आहे. खेडी आधुनिकतेची कास धरू लागली. शहरात मिळणार्या सुविधा ग्रामीण भागात आता मिळू लागल्या आहेत. मात्र अतिक्रमणे,बेकायदेशीर बांधकामे वाढत असल्याने गावपातळीवर समस्या वाढत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागात बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्याची मागणी होत आहे.

जत तालुक्यात अनेक खेडी स्वयंपूर्ण झाली आहेत. आज आपण छोट्याशा खेड्यात गेलो तरी चांगले व्यवसाय, हॉटेल, तसेच टुमदार घरे पाहावयास मिळतात. शेतकरी सधन झाल्यामुळे बंगला, घरापुढे गाडी या गोष्टी सर्रास पाहावयास मिळतात. मात्र, आता अतिक्रमणे होऊ लागली आहेत. विशेषत: अनेक गावांत गायरान जागेवर बांधकाम उभे राहिले आहे. काही गावांत अतिक्रमणाची समस्या अधिक होऊ लागली आहे. गावात घराचे अथवा इमारत बांधकाम करताना कुठलीही परवानगी घेतली जात नाही व जागेची मोजणीसुद्धा केली जात नाही. तसेच सिटी सर्व्हेमध्ये सरकारी जागा असताना अथवा रस्ते दाखविले असताना बेकायदेशीरबांधकामे केली जातात. राजकीय दबावापोटी ग्रामपंचायतमध्ये खोट्या नोंदी केल्या जातात. ग्रामपंचायत सदस्य अथवा ग्रामसेवक कुठली कागदपत्रे न पाहता बोगस नोंदी करतात. यामुळे नंतर अनेक समस्या निर्माण होत आहेत. वादविवाद,हाणामार्यासारख्या घटना घडत आहेत. या गोष्टींना आळा बसला पाहिजे. शासनाने परिपत्रक काढून याबाबत काटेकोर असे निर्बंध घातले पाहिजेत,म्हणजे पुढील काळात अतिक्रमणे काढताना अडचणी येणार नाहीत. शिवाय सध्याची बेकायदेशिर बांधकामे हटवण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment