Friday, January 11, 2019

जत येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात

जत,(प्रतिनिधी)-
जत येथील राजे रामराव महाविद्यालय येथे राष्ट्रमाता जिजाऊ  व स्वामी विवेकानंद  यांची जयंती  मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

प्रारंभी प्रा.सी.वाय.मानेपाटील व प्रा.श्रीमंत ठोबरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.पी.आर.वाघमोडे म्हणाले की, आजच्या तरुण पिढीला राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची गरज आहे. राष्ट्र व चांगल्या समाज निर्मितीसाठी युवकांनी जिजाऊ व विवेकानंद यांच्या चरित्राचे वाचन करावे, असे सांगून प्रा.वाघमोडे यांनी विवेकानंद व जिजाऊ माँसाहेब यांचा जीवनपट व त्यांचे विचार विद्यार्थी आणि उपस्थितांसमोर मांडला. आजच्या काळातही या दोन महान विभूतींच्या विचारांची आजच्या काळात आवश्यकता  असल्याचे प्रा.वाघमोडे यांनी स्पष्ट केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक प्रा.डॉ.गावडे यांनी तर आभार प्रा.कुमार इंगळे यांनी केले. यावेळी   प्रा.एस.डी. चव्हाण, प्रा.महादेव करेनवर,  प्रा. एस. डी. ठोंबरे, कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment