Saturday, January 26, 2019

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आसंगी(जत) शाळेचे घवघवीत यश

जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा परिषदे अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये आसंगी(जत) येथील जिल्हा परिषद  प्राथमिक मराठी शाळेने यश मिळवले आहे. दादासो अंकुश गायकवाड या विद्यार्थ्याने लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक, ५०मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक व १०० मीटर धावणे या वैयक्तिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक असे तिहेरी यश मिळवून शाळेचे नाव लौकिक केले आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून  कौतुक होत आहे.

         जिल्हा परिषदेच्या वतीने या विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र, चषक, मेडल देऊन शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
 या विद्यार्थ्याला मार्गदर्शन क्रीडा शिक्षक सुभाष हुवाळे, भिमण्णा मणंकलगी,मल्लिकार्जुन कोळी,आण्णाप्पा कबाडगे,शशिकांत कुलकर्णी,स्वाती जाधव व मुख्याध्यापक नागाप्पा होर्तिकर यांनी केले.
          शाळेच्या वतीने व ग्रामपंचायतच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळ कोळी, उपाध्यक्षा रेखा जाधव, सहायक शिक्षिका संजीवनी कांबळे, केंद्रप्रमुख रतन जगताप, हनुमंत सोनवणे व सरपंच श्रीमंत पाटील, उपसरपंच विकास जाधव यांनी व सर्व शिक्षक यांचे विशेष कौतुक केले.

No comments:

Post a Comment