Thursday, January 3, 2019

पूजा साबळे बी. एड. परीक्षेत महिला विद्यापीठात प्रथम

जत,(प्रतिनिधी)-
जत येथील गंगाबाई गोब्बी अध्यापक महाविद्यालयात  शिक्षण घेत असलेली कु.पुजा दिलीप साबळे ही विद्यार्थीनी मुंबई येथील  एसएनडीटी महिला विद्यापीठ येथून बी.एड. परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. सदर परिक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तिला महिला विद्यापीठाने "केशवप्रसाद देसाई"  या पुरस्काराने व गोल्ड मेडल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कु. साबळे ही विद्यार्थीनी चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथील एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील आहे. तिचे वडील दिलीप तुकाराम साबळे हे वसंतदादा पाटील विद्यालय, चोरीची येथे शिपाई म्हणून काम करत आहेत. ग्रामीण भागात राहूनही आपण कशातही कमी नाही, हेच या मुलीने आपल्या या यशाने दाखवून दिले आहे. या विद्यार्थीनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment