Tuesday, January 22, 2019

सांगली जिल्ह्यात एचआयव्ही रुग्ण दीड टक्क्यांवर


जत,(प्रतिनिधी)-
एड्सच्याबाबतीत सांगली जिल्ह्याचे नाव मुंबई,पुणे पाठोपाठ घेतले जात होते. मात्र गेल्या दहा वर्षात यात कमालीची घट झाली आहे.2006 मध्ये एड्सचे रुग्ण तब्बल 35 टक्के होतेआज हेच प्रमाण फक्त दीड टक्क्यांवर आले आहे.  प्रबोधन,  समुपदेशन आणि बाधित रुग्णांवरील योग्य उपचार यामुळे एचआयव्हीचे प्रमाण घटण्यास मदत झाली आहे.

2000 च्या दरम्यान एड्स आजाराने संपूर्ण भारतभर धुमाकूळ घातला होता.महाराष्ट्रातही मुंबई,पुणे पाठोपाठ सांगलीतही एड्सचा फैलाव झाला होता. या काळात एकप्रकारची भीती जिल्ह्यात पसरली होती.या वाढणार्‍या एड्स रुग्णांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र हादरून गेला होता.या रोगाला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली होती. सर्वच शासकीय पातळीवरप्रसारमाध्यमातून जोरदारपणे जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती.समुपदेशन आणि योग्य प्रकारच्या औषधोपचारामुळे गेल्या दहावर्षात एडसच्या रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. 2006 मध्ये सांगली जिल्ह्यात तब्बल 34.74 टक्के रुग्ण आढळून आले होते. आज हेच प्रमाण 1.54टक्क्यांवर येऊन पोहचले आहे. एड्सच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच याबाबतीत यश येईल,असा विश्‍वास आरोग्याधिकार्‍यांनी व्यक्त केला.
2010 पर्यंत एड्स रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढतच होता. मात्र त्यानंतर त्यात घट येऊ लागली. 2010 मध्ये एड्स रुग्णांची संख्या3213 इतकी होती.2011 मध्ये यात आणखी मोठी घट होत ही संख्या 2552 वर आली. आज यात कमालीची घट झाली असून 2016 मध्ये448 एचआयव्ही (एड्स) बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांवर योग्य उपचार होत असल्याने त्यांच्या आरोग्यात सुधारणा होऊन त्यांचे आयुष्यमान वाढण्यात मदत झाली आहे.रुग्णांना योग्य प्रकारे समुपदेशन करून त्यांना एम आरटीकडे पाठवले जाते. या केंद्रात रुग्णाला आहार व रुग्णाने घ्यावयाची काळजी याबाबत व्यवस्थितरित्या समुपदेशन केले जाते.


No comments:

Post a Comment