Sunday, January 6, 2019

अँसिडिटीपासून मुक्ती मिळवा


सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत खाण्यापिण्याचे नियम पाळले जात नाहीत. आहाराच्या वेळा अनियमित होतात. पण, यामुळेच अँसिडिटीची समस्या सतावू लागते. तेलकट आणि मसालेदार पदार्थांमुळे गॅसेसची समस्या उग्र रूप धारण करते. अँसिडिटीमुळे पोटदुखी, छातीत जळजळ, डोकेदुखी, करपट ढेकर, उलट्या आदी त्रास संभवतो. यावर औषधोपचार आहेत.
मात्र, काही घरगुती उपायानंही हा त्रास कमी करता येतो. लसूण, जिरे आणि धने पाण्यात उकळावे आणि हा काढा दिवसातून दोन वेळा घ्यावा. याने अँसिडिटी शमते. गॅसेसची समस्या असल्यास आल्याचा तुकडा चघळावा. दररोज जेवणानंतर आलेपाक खाण्याचा रिवाज ठेवल्यास गॅसेस आणि अँसिडिटीचा त्रास कमी होतो. पुदिन्याची पानं उकळून तयार झालेल्या काढय़ात मध घालून प्यावं.
यानंही अँसिडिटी आणि गॅसेसची समस्या दूर होते. केळं, तुळस, थंड दूध, बडीशेप, जिरे, लवंग, वेलची, पुदिना, आले, आवळा हे घटक अँसिडिटी आणि गॅसेसची समस्या दूर करणारे आहेत. म्हणूनच आहारात त्यांचा वापर वाढवावा.No comments:

Post a Comment