Thursday, January 3, 2019

महिनाभर जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन


जत,(प्रतिनिधी)-
 लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मरणार्थ यावर्षीच्या आरोग्य शिबिरांचा मोठया संख्येने लाभ घ्या, असे आवाहन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले. राजारामबापू सह. साखर कारखाना व सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्व. बापूंच्या स्मरणार्थ संपूर्ण जिल्ह्यात महिनाभर आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत.

या शिबिरांचा शुभारंभ जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील गजानन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ईश्वराप्पा रवी (पाटील) यांच्या हस्ते स्व. बापूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालक विराज शिंदे, प्राचार्य व्ही. एम. मुलगे, प्रा. एन. एस. स्वामी, ग्रामसेवक एस. बी. बिरादार, कल्लाप्पा उंबर्जी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी (पाटील) यांचे या शिबिरास विशेष सहकार्य मिळाले. पी. आर. पाटील म्हणाले, स्व. बापूंचा जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर या आपल्या दुष्काळी तालुक्यांवर विशेष लोभ होता. त्यांनी या तालुक्यांचा दुष्काळ हटविण्यासाठी खुजगाव धरणाचा प्रयत्न केला. मात्र त्यांना राजकीय विरोध झाला आणि आजही हे तालुके दुष्काळाच्या झळा सोसत आहेत.
ईश्वराप्पा पाटील म्हणाले, स्व. बापू हे लोकोत्तर नेते होते. त्यांची जत तालुक्याशी नाळ जोडली होती. त्यांनी आमच्या कॉलेजची मंजुरी, तसेच ग्रँटसाठी मोठे सहकार्य केले होते. डॉ. डी. जी. पवार, डॉ. बी. टी. पवार, डॉ. हेमा कांबळे, डॉ. सुवर्णा सपकाळ, डॉ. प्रकाश म्हाळुंगकर यांनी शिबीर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. शिबिरात सर्व तपासण्या केल्या जाणार असून शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जीवनदायी योजनेचे सहकार्य घेतले जाणार आहे.

No comments:

Post a Comment