Saturday, January 5, 2019

प्रेमात पडलेल्या जोडप्याची गावातून धिंड

 ही बातमी आहे भंडारा जिल्ह्यातील अड्याळ गावातील. येथील गावातील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे संतप्त झालेल्या घरच्याच लोकांनी आपल्याच घरातील माणसाची त्या  महिलेसह गावभर धिंड काढली.

 रामकृष्ण कुरंजेकर या विवाहित पुरुषाचे गावातील एका विवाहित महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. ही विवाहिता रामकृष्णच्या घरी आली. त्यामुळे घरच्या मंडळींचा संताप अनावर झाला. रामकृष्णला एका सायकलरिक्षात बसवून गावभर धिंड काढण्यात आली. त्याला पोलीस पाटलांच्या घरी नेण्यात आले, तेथेही त्याची समजूत काढण्यात आली. मात्र, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. या प्रकारानंतर रामकृष्णाने अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून श्रीकृष्ण कुरंजेकर, विलास कुरंजेकर, रामकृष्णची पत्नी राजेश्‍वरी कुरंजेकर, आई सुमन कुरंजेकर, विठ्ठल देशमुख, मारोती देशमुख, वासुदेव जिभकाटे आणि नागेश जिभकाटे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेचे या पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या नातेवाइकांनी दोघांना समजावले. तरीही त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. रविवारी ही महिला अचानक संबंधित पुरुषाच्या घरी गेली व आम्हाला पती-पत्नीप्रमाणे सोबत राहायचे आहे, असे सांगू लागली. पुरुषाचे नातलग प्रचंड संतापले आणि मोठा भाऊ, धाकटा भाऊ, त्यांची पत्नी, वडिलांनी दोघांची हातगाडीच्या रिक्षातून गावात धिंड काढली.

No comments:

Post a Comment