Sunday, January 6, 2019

(हे लक्षात ठेवा!) विजेमुळे होणारे अपघात


दैनंदिन आयुष्यात लहान-सहान गोष्टी विचारात घेतल्यास विजेमुळे होणारे अपघात हमखास टाळता येणे शक्य आहे. अज्ञान किंवा अतिआत्मविश्‍वास, अतिउत्साहामुळे दरवर्षी विजेचे शेकडो बळी जात असतात, तर अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्व येत असते. शे-पाचशे रुपयांच्या वीजचोरीसाठी लाखमोलाच्या जीवाची बाजी लावल्या जाते, वीज तारांमधे अडकलेला पतंग काढायला जीव धोक्यात घातला जातो. वीज वाहिनीखाली घरांचे बांधकाम केल्या जाते, वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जातो, ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळली जातात, सार्‍या गोष्टी म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण असल्याने या गोष्टी टाळून अपघातविरहित वीजपुरवठय़ाच्या ध्येय आहे.

विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका. वीज वाहिनीच्या खाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका. अर्थिंगची व्यवस्था असलेली थ्री-पीन असलेलीच उपकरणे वापरा. परवानाधारक कंत्राटदाराकडूनच घरातील वीज वायरिंग करून घ्या. 'आयएसआय' प्रमाणित वीज वायर्स, केबल्सचा वापर करा. अतिभार किंवा शॉर्ट सर्किटमुळे हानी होऊ नये यासाठी योग्य क्षमतेची एमसीईबी/ एमसीसीबी वापरा. विद्युत खांब किंवा तणाव तारांना गुरे-ढोरे बांधू नका. विद्युत प्रवाह शेतातील कुंपणात सोडू नका. न्यूट्रलसाठी उघड्या तारांचा वापर टाळून इन्सुलेटेड तारांचा वापर करा. तात्पुरते, लोंबकळणारे वायर्स वापरू नका. विजेचा अनधिकृत वापर टाळा. विद्युत उपकरणे दुरुस्तीच्या वेळी, त्याचा वीजपुरवठा बंद करून प्लग काढला असल्याची खात्री करा. कूलरमधे पाणी भरताना स्लीपर्स घालाव्यात सोबतच कूलरचा प्लग काढला असल्याची खात्री करा. वीज तारांखाली गुरे-ढोरे अथवा कापणी झालेले पीक ठेवूनका. कपडे वाळविण्यासाठी वीज तारांचा वापर करू नका. विनाकारण वीज खांबावर चढू नका.

No comments:

Post a Comment