Sunday, January 6, 2019

परंपरागत लोहार-सुतार व्यवसायावर अवकळा


यंत्रांचा वापर वाढला : आधुनिकीकरणाने हिरावला रोजगार, अत्यल्प मोबदल्यात करावा लागतो कुटुंबाचा उदरनिर्वाह
जत,( प्रतिनिधी)-
शेतीप्रधान भारत देशातील विविध शेतीपयोगी अवजारांच्या निर्मितीसाठी व दुरुस्तीच्या परंपरागत व्यवसायाला आधुनिकीकरणाचे ग्रहण लागले आहे. शेतीमध्ये यंत्राचा वापर वाढल्याने लोहार व सुतार यांच्या व्यवसायावर अवकळाचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.
परिसरातील अनेक खेड्यातील लोहार-सुतार समाजाचा हा व्यवसाय तर शेवटच्या घटका मोजत असल्याने आहे

दिवसरात्र लोखंडाला आकार देण्याचे काम लोहार समाज करतो. त्यातून त्यांचा अल्प मोबदला मिळतो. त्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. लोहार समाजाचा बैलगाडी अथवा गाढवाच्या पाठीवर साहित्य टाकून या गावातून दुसर्या गावात असा प्रवास अव्यहातपणे सुरू असतो. लोहार समाज पांचाळ म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु आता या कुटुंबांना काळानुरूप झालेल्या आधुनिकीकरणाचा चांगलाच फटका बसला आहे. पूर्वीच्या काळात आधुनिक यंत्रसामग्री नसताना शेतीचे अवजारे दुरुस्त करण्याचे कार्य लोहार समाजालाच करावे लागायचे. त्यावेळी मुबलक रोजगार मिळत असते. त्याच्या हस्तकौशल्याला तेव्हा वाव होता. पण अलीकडे शेतीचा कल रेडिमेड वस्तूकडे वाढला आहे.
शेतीच्या मशागतीसाठी वापरली जाणारी यंत्रे जसे नागर, वखर, डवरे, पासा, कुर्हाड, कुदळ, कोयता, खुरपे याचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे त्यांची देखभालही फारशी करावी लागत नाही. सुतार समाजाची देखील तशीच अवस्था झाली आहे. सुताराचा व्यवसायदेखील सध्याच्या अधुनिकिकरणामुळे व हायटेक बाजारामुळे हे व्यवसाय पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाकडून कौशल्यावान लोहार व सुतार समाजाचे पुनर्वसन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या कौशल्याचा वापर करून घेतल्यास युवापिढीला याचा उपयोग होईल. त्याचप्रमाणे या कौशल्याच्या बळावर या परंपरागत व्यवसायातून या समाजाला थोडाफार रोजगार उपलब्ध होऊ शकतो. शासन दप्तरी मात्र या समाजाची उपेक्षाच होताना दिसते. यावर सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment