Thursday, January 10, 2019

जतमध्ये विवाहित महिलेचा विनयभंग


जत,(प्रतिनिधी)-
जत  शहरातील एका पंचवीस वर्षे वयाच्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून संजय विलास कांबळे ( वय 32  रा. आंबेडकर नगर जत ) याच्या विरोधात पीडित महिलेने सोमवारी रात्री उशिरा जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे . ही घटना सोमवारी  रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान पीडित महिलेच्या घरात  घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नाही.

             याबाबत अधिक माहिती अशी की पीडित महिला पती ,आई व दोन मुलांसमवेत जत शहरातील घरी राहते सोमवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घरात कोण नाही अशी संधि पाहून संजय विलास कांबळे याने पीडित महिलेच्या घरी जाऊन तिचा विनयभंग केला. सदर घडलेली घटना  पती व आईला तिने सांगितली . त्यानंतर यासंदर्भात रात्री उशीरा जत पोलिसात पिडीतेने फिर्याद दाखल केली आहे. संशयित आरोपी हा विवाहित असून तो प्लंबिंग व्यवसाय करत आहे . त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही . घटना घडल्यानंतर तो फरार झाला आहे . पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवलदार विजय वीर करत आहेत.

No comments:

Post a Comment