Thursday, January 3, 2019

शिक्षिकांना सावित्री-फातीमा पुरस्कार देणार


 महेश शरनाथे
सांगली,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सावित्री - फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे व कृष्णा पोळ यांनी केली. दरम्यान, या पुरस्कार वितरणासह मुंबई शिक्षक मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आल्याबद्दल शिक्षक आमदार कपील पाटील यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व त्यांच्याबरोबर काम करणार्या फातिमा शेख यांच्या कार्याचा वसा चालविणार्या, सध्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणार्या महिला शिक्षकांना सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार दिले जाणार आहेत. शिक्षक आमदार कपील पाटील यांचा सत्कार सोहळा आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे व महेश चोथे, ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती महेश शरनाथे, कृष्णा पोळ, सुधाकर माने, फैसल पटेल यांनी दिली.
यावेळी विद्या चव्हाण, सुनीता पाटील, आरती खिलारे, स्फूर्ती निकम, अर्चना माने, सुवर्णा बच्चे, अशोक कोळेकर, पोपट निकग, कादर आत्तार, प्रकाश चव्हाण, दीपक काळे, संजय कवठेकर, दादासाहेब महाडिक, कृष्णा पोटफ ोडे, उदयकुमार रकटे, महेशकुमार चौगुले, चंद्रशेखर क्षीरसागर, सुधाकर वसगडे, चंद्रकांत भोसले, दिगंबर सावंत, शौकत नदाफ, दादासो खोत, नंदकुमार पाटील, बिरु मुढे, चंद्रकांत गवळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment