Monday, January 14, 2019

जिजाऊंनी स्वराज्य निर्मातीची प्रेरणा दिली : प्रा. बाबासाहेब भेंडे-पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या प्रेरणेने महाराष्ट्राला दोन छत्रपती मिळाले. राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्यामुळेच महाराष्ट्र यवनी अत्याचारातून मुक्त झाला. जिजाऊ आईसाहेब यांनी सासर आणि माहेर या दोन्ही बाजू सांभाळून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, असे प्रतिपादन प्रा. बाबासाहेब भेंडे- पाटील यांनी केले.

 अखिल भारतीय मराठा सेवा संघ जतच्यावतीने जत येथील अथणी मार्गावरील छत्रीबाग येथे आयोजित केलेल्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या 421 व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. जत संस्थानच्या व श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा ज्योत्स्नाराजे डफळे यांच्या हस्ते जत संस्थानचे राजे श्रीमंत रामराव महाराज डफळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जत नगरपरिषदेच्या नगरसेविका दीप्ती सावंत, स्वप्नाली ताड, अनुराधा सुनील संकपाळ यांच्या हस्ते राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आईसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कु.धनश्री देशमुख या चिमुरड्या मुलीने अफजलखान वधावर पोवाडा सादर केला व प्रीतम गणेश सावंत याने जिजाऊ आईसाहेब यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महादेव साळुंखे, सुभाष गायकवाड, अजित पाटील उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र बाबर, मोहन माने-पाटील, अनिल शिंदे, बाळासाहेब जाधव, नगरसेवक विजय ताड, प्रकाश माने, गणेश सावंत, अरूण शिंदे, गणपतराव कोडग, डॉ. महेश भोसले, सुधीर चव्हाण, कुमार इंगळे, शहाजी भोसले, मधुकर जाधव आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment