Sunday, January 6, 2019

पंचायत समिती सदस्यांच्या भत्त्यात वाढ करा


जत,( प्रतिनिधी)-
पंचायत समिती सदस्यांना मिळणार्या बैठक भत्त्यात वाढ करण्यात यावी यासह 14 व्या वित्त आयोगाचा निधी पंचायत समिती स्तरावर वितरीत करून त्यांचे नियोजन करण्याचे अधिकार पंचायत समितीच्या सदस्यांना देण्याची मागणी पंचायत समिती सदस्यांकडून होत आहे.

पंचायत समिती ग्राम पंचायत व जिल्हा परिषद यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये पंचायत समितीला महत्वाचे स्थान आहे. पंचायत समितीसाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधींना महत्वाचे स्थान आहे. त्यांना नाममात्र बैठक भत्ता मिळत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेवर पाठविण्यात येत असलेल्या आमदाराच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही.
जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व पंचायत समिती सभापती यांना फक्त मतदानाचे अधिकार आहेत. पंचायत समिती सदस्य हे देखिल 3 ते 5 गावांचे प्रतिनिधीत्व करीत असतात. त्यांना मतदानाचे अधिकार मिळणे आवश्यक असुनही त्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्ळात आले आहे. अलिकडे 14 वा वित्त आयोगाचा 100 टक्के निधी ग्राम पंचायत स्तरावर वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पंचायत समिती सदस्य महत्व उरले नाही.
त्यामुळे पंचायत राजचे बळकटीकरण करण्यासाठी सदस्यांना विधान परिषद सदस्यांकरिता मतदानाचा अधिकार तसेच वित्त आयोगाचा निधीचे नियोजन करण्याचे अधिकार देवून नाममात्र जो बैठक भत्ता मिळतो त्यामध्ये वाढ करण्याची मागणी पंचायत समिती सदस्यांकडून केली जात आहे.

No comments:

Post a Comment