Sunday, January 6, 2019

अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे रुग्णांची हेळसांड


 जत,( प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या दक्षिण भागासह अनेक भागांतील  गावांमधील आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांमधील कर्मचार्यांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. या जागा गेले अनेक दिवस न भरल्याने रुग्णांची मोठया प्रमाणात हेळसांड होत आहे.या जागा भरण्याची मागणी होत आहे.

 आरोग्य विभागाने रिक्त जागा त्वरित न भरल्यास  तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जाडरबोबलाद जिल्हा परिषद माजी सदस्या सुशीला होनमोरे यांनी दिला आहे. जत तालुक्याच्या बिळूरसह पूर्व भागातील येळवी, माडग्याळ,जाडरबोबलाद उटगी, उमदी, बोर्गी येथे आरोग्य उपकेंद्र आहेत. अपुर्या कर्मचार्यामुळे रुग्णांना तासन्तास ताटकळत बसावे लागते.आरोग्य विभागाच्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने रुग्णांना सुविधा वेळेवर उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे रुग्ण दगावण्याचा धोका आहे. त्याचबरोबर रुग्णाला खासगी दवाखान्याकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. यामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे.त्यामुळे रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment