Tuesday, January 8, 2019

कोसारीचे राष्ट्रीय पेयजल योजनेचे दप्तर चोरीला : भोसले


जत,(प्रतिनिधी)-
 राष्ट्रीय पेयजल योजनेचे प्रकरण जिल्ह्यात गाजत असतानाच कोसारी ग्राम पंचायतीमार्फत चालू असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे दप्तर चक्क ग्रामपंचायतीकडेच उपलब्ध नसल्याची तक्रार कोसारी ग्रामपंचायत सदस्य व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सांगली जिल्हा-संघटक नानासाहेब भोसले यांनी जत पंचायत समितीकडे केली आहे.

ते म्हणाले, योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून पूर्वी या कामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून संबंधित ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर गुन्हा दाखल झाला होता. परंतु ही बाब न्यायप्रविष्ट असून या योजनेचे काम अपूर्ण आहे. तरी या कामाबद्दल चौकशी केली असता ग्रामसेवकांनी या योजनेचे कोणत्याही प्रकारचे दप्तर ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्याचे लेखी पत्र देतात. ही बाब गंभीर असल्याने कोसारी राष्ट्रीय पेयजल योजनेची चौकशी करण्याची मागणी केली भोसले यांनी केली आहे. ते म्हणाले, चौकशी न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment