Thursday, January 3, 2019

पीकविम्याची रक्कम त्वरित द्यावी : संतोष पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला असल्याने जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला असला, तरी पीकविम्याची रक्कम देण्याची मागणी बाजार समितीचे माजी सभापती, विद्यमान संचालक संतोषगौडा पाटील यांनी केली आहे.

चालू वर्षी कमी झालेला पाऊस, त्यामुळे शेतकर्यांचा शेतीला लागलेला खर्चही निघाला नाही. एवढी बिकट परिस्थिती झाली असताना शासनाकडून फक्त दुष्काळ जाहीर केला असला तरी त्यांच्या सवलती शासन जाहीर करूनही सवलती मिळाल्या नाहीत. शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असताना पिकापासून उत्पादन नाही, दुसरा धंदा नाही, अशा स्थितीत शेतकर्यांसमोर उदरनिर्वाहाचा फार मोठा प्रश्न उभा झाला आहे.
पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. पीकविम्याची रक्कम देण्यात यावी, अशी जत तालुक्यातील शेतकरी मागणी करीत आहेत. मात्र शासन या मागणीकडे लक्ष देत नाही. तालुक्यातील शेतकर्यांसमोर एवढी मोठी कठीण परिस्थिती उद्भवली असताना शेतकरी, शेतमजूर हे रोजगाराच्या व कामधंद्याच्या शोधात घराबाहेर पडू लागले आहेत. तरी पीकविम्याची रक्कम त्त्वरीत दिल्यास शेतकर्यांना थोडासा दिलासा तरी मिळेल. यासाठी पीकविम्याची रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी संतोष पाटील यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment