Saturday, January 5, 2019

वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. बळीराम राठोड


जत,(प्रतिनिधी)-
 राज्याचे माजी मुख्यमंत्री व बंजारा समाजाचे नेते कै. वसंतरावजी नाईक यांच्या नावे सुरु करण्यात आलेल्या राज्य पातळीवरील अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या जत तालुका अध्यक्षपदी प्रा. बळीराम जयराम राठोड यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी प्राथमिक शिक्षक व्यंकटेश विठोबा राठोड यांची निवड करण्यात आली.

या संघटनेची बैठक नुकतीच हॉटेल सी स्व्केअर येथे संपन्न झाली. यावेळी या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी राज्यातील व जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी प्रा. सचिन चव्हाण(वालचंद कॉलेज, सांगली), प्रा. युवराज चव्हाण (मिरज), अभियंता रंगनाथ चव्हाण (कराड), प्रा. दासू सा. पवार (विलींग्डन कॉलेज), प्रा. शंकर राठोड उपप्राचार्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संघटनेचे इतर कार्यकारणी अशी: कार्याध्यक्ष- रामचंद्र लालसिंग राठोड, उपाध्यक्ष- मोहन थावरू चव्हाण, इंजि.  परशुराम वीरसिंग राठोड, संघटक: भीमराव विठ्ठल राठोड, सहसचिव- सौ. शारदा बाबुराव नाईक तर ज्येष्ठ सल्लागार म्हणून साप्ता. विजयावाणीचे कार्यकारी संपादक विजय बाबुराव नाईक, तुकाराम नाना राठोड, विष्णू सोमा राठोड (निवृत्त तलाठी) यांच निवड करण्यात आली.

No comments:

Post a Comment