Friday, January 4, 2019

जत तालुका वृत्तपत्र एजंट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बापूसाहेब पवार यांची निवड


जत,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील वृत्तपत्र एजंटांची बैठक आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवालय परिसरात उत्साहात पार पडली. यावेळी जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. जत तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब पवार यांची निवड करण्यात आली.

ज्येष्ठ वृत्तपत्र एजंट अनंत गोरे अध्यक्षस्थानी, तर राज्य संघटना उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, राज्य संचालक मारुती नवलाई यांच्या प्रमुख उपस्थिती होती. स्वागत कार्याध्यक्ष शिवाजी काकडे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. जिल्हा संघटनेच्या कामकाजाची माहिती सचिन चोपडे यांनी दिली. जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित एजंटांनी व्यवसायातील आपले अनुभव, अडचणी व संघटनेकडून आपल्या अपेक्षा याबाबत मनोगत व्यक्त केले. राज्य संघटना उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी राज्य संघटनेचे कामकाज व कल्याणकारी मंडळाबाबत शासन दरबारी सुरू असणारे प्रयत्न याबाबत सविस्तर माहिती दिली.
 शहरी भागातील वृत्तपत्र विक्रेत्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील एजसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. एजंटांचे प्रश्न सुटण्यासाठी ग्रामीण भागातील एजंटानी एकत्रित यावे, असे आवाहन केले. राज्य संघटनेचे संचालक मारुती नवलाई यांनी जिल्हा व राज्य संघटना यांच्याकडून ग्रामीण भागातील एजंटांसाठी व्यापक लढा उभारण्याची घोषणा केली. या बैठकीस जिल्हा संघटनेचे विशाल रासनकर, देवानंद वसगडे, अनिल रूपनर, नागेश कोरे, विनायक तांबोळकर, राजेंद्र पोटे यांच्यासह संतोष खंडागळे (आसंगी), महादेव कुंभार (सोरडी), संजय जेऊर (बनाळी), संतोष भोसले (अग्रण धुळगाव), शंकर जाधव (वळसंग), अरूण मोरे (अलकुड एम.), तानाजी जाधव (चिंचणी), धनंजय सूर्यवंशी (पलूस), संदीप माळी (तासगाव) यांच्यासह वृत्तपत्र एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कवठेमहांकाळ व जतचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे यावेळी कवठेमहांकाळ तालुकाध्यक्षपदी महारूद्र कुंभार (ढालगाव), उपाध्यक्ष तानाजी पवार (रांजणी), सचिव अनंत गोरे (कवठेमहांकाळ), खजिनदार अरुण मोरे, संचालक नबीलाल तांबोळी, संतोष भोसले. जत तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब पवार (जत), उपाध्यक्ष प्रकाश कोरे (वाळेखिंडी), सचिव शंकर जाधव (वळसंग), खजिनदार अनिल सायगावकर (संख). सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी बांधवांचा राज्य व जिल्हा संघटना पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment