Monday, February 18, 2019

'व्हॉट्स अँप' छंद बनला प्रेमाचा गुलकंद


जत,(प्रतिनिधी)-
प्रेम या अडीच अक्षराकरित चिठ्ठी, हातवारे, मित्रांची मदत यासह अनेक गोष्टींचा आधार घेत प्रेमभावना व्यक्त करण्यात येत होत्या. याबाबी आता इतिहास जमा होऊ लागल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात परिभाषेचा सरळ मार्ग आता अँन्ड्रॉईड मोबाईल झाला आहे. इंटरनेट सेवेमुळे 'व्हॉट्स अँप' हा छंद प्रेमीयुगलांसाठी दुाध शर्करा योग ठरत आहे. मदतनीस ठरणार्‍या या मोबाईल संचामुळे प्रेमभावना सोडा, चक्क प्रेमाचा गुलचंद चाखण्यासारखा आनंद प्रेमविरांना येत आहे. अपेक्षित असलेले पोस्ट पाहून गालातल्या गालात दुखणे हसणारे प्रेमी चार चौघात सुध्दा देह भान विसरत चालल्याचे दिसून येते. मात्र या प्रकाराला आळा घालण्यात पालकवर्ग अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया सामाजिक बांधिलकी असणार्‍या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

तु समोर असलीस की माझाही आधार लागत नाही. तु फक्त हसत रहा, मी दुसरं काहीच मागत नाही. असा प्रेमविरांच्या भावना त्याचे मात्र प्रकट करण्याचे माध्यम आता बदलत आहे. पूर्वी एकमेकांना चिठ्ठी लिहिणे, घरावरील गच्चीवरून इशारे करणे, ग्रिटींग, प्रेमपत्र लिहिणे मित्रांची मदत घेणे, असे क्रम प्रेमी युगलांकडून होत होते. प्रेमभावना व्यक्त करताना कठीण पर्शिम घेत अडचणी निर्माण होत होत्या. मंडळींची, शेजार्‍यांची नजर चुकवून हे काम करावे लागत होते. घरातून बाहेर पडताना वाहन म्हणून सायकलचा आधार घ्यावा लागत होता.
शिक्षण घेणारे प्रेमी युगल शाळा महाविद्यालय, रमणीय ठिकाण, यात्रा, बाजारपेठ अशा ठिकाणी एक दुसर्‍याची आतुरतेने प्रतीक्षा करीत असत. एवढेच नाही तर प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी केवळ एकमेकांची नजर झाली तरी प्रेमीयुगल समाधान मानत असतं. मात्र आता तंत्रज्ञानाच्या युगात अँनड्रॉईड मोबाईल, वाहने यांनी प्रेमीयुगलांना भुरळ पाडली आहे. विविध ज्ञान मिळविण्यासाठी उपयोगी असलेल्या इंटरनेटच्या माध्यमातून युवक व युवतींकडून आता प्रेमी वृद्धीसाठी वापर वाढला आहे. याची पुसटशी कल्पनाही पालकांना येत असून सुध्दा त्यांना अटकाव होत नाही. मोबाईलचा फ्रंट कॅमेरा, हेडफोन याचा उपयोग करत प्रेमीयुगल आपले काम भागवताना दिसतात. विशेष म्हणजे चॅटिंग केल्या जाते. मात्र असेल त्या वयातील मुले, युवक व युवती नको त्या वेळी प्रेम प्रकरणात रमत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक बाबींवर होण्याची शक्यता आहे. या सोबतच मोबाईलवरून प्रेमाची वाढलेली धुंदी प्रेमीयुगलांना बेभान करीत आहे.
त्यामुळे भरचौकात रहदारीच्या ठिकाणी तसेच रस्त्याच्या बाजुला आपल्या नजरा कायम ठेवत मोबाईल हाताळणारे अंगठे बहादूर दिसून येतात. त्यांच्या या वागण्याने मात्र इतरांना लाजविणार्‍या प्रकारात वाढ होत आहे. अशाही प्रेमी युगलांच्या विविधांगी चर्चा आता रंगत आहेत.
प्रसंगी वेळेचे व स्थळाचे भान न ठेवणार्‍यांना दुर्घटनेला सामोरे जाण्याची शक्यता बळावली आहे. तेव्हा व्हॉट्स अँपचा छंद जोपासत प्रेमाचा गुलकंद चाखण्याच्या तयारीत असलेल्या प्रत्येकावर आप्त स्वकीयांचा दृष्ट्या हे प्रकार खाजगी ठेवावेत, ते सार्वजनिक होवू नयेत याची खबरदारी घेण्यात यावी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment