Wednesday, March 6, 2019

बलात्कार पीडितेला वेश्या बनवण्याची धमकी; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

सांगली,(प्रतिनिधी)-
 लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित पीडिता गर्भवती असून संशयिताने आता तिच्या वडिलांना फोनवरून तुमच्या मुलीला वेश्या करणार असल्याची धमकी दिल्याने पीडितेने पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित समाधान निवृत्ती केंगार (रा. चोपडी, ता. सांगोला ) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सांगोला तालुक्यातील चोपडीत राहणारा संशयित समाधान केंगारने 2017 मध्ये पीडिता अल्पवयीन असताना तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला सांगलीतील जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवास मधील घरात ठेवले. दरम्यानच्या काळात मोटारसायकलवरून तासगाव परिसरातील शिरगाव रस्त्यावरील शेतात आणि लॉजवर तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. पीडिता गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर संशयिताने तिला धमकावायला सुरुवात केली. त्यामुळे पीडिता आता दुसरीकडे भाड्याने घर घेऊन राहत आहे. संशयिताने पीडितेच्या वडीलांना फोन करून त्यांच्या मुलीला वेश्या करणार असल्याची धमकी दिली. त्याने धमकी दिल्याचे समजताच पीडितेने शहर पोलिसांत धाव घेऊन समाधान केंगार याच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दिली आहे. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.

No comments:

Post a Comment