Thursday, March 14, 2019

मानव हाच भारतीय राज्यघटनेचा केंद्रबिंदू:प्राचार्य डॉ.ढेकळे

जत,(प्रतिनिधी)-
भारत हा  जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. या देशाच्या लोकशाहीच्या केंद्रस्थानी राज्यघटनाच आहे आणि राज्यघटनेचा केंद्रबिंदू हा मानव असून भेदाभेद अमंगळ हीच शिकवणूक भारतीय राज्यघटना देते. राज्यघटना ही भारतीय लोकशाहीचा आत्मा असून त्यांचे  संरक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.व्ही.एस.ढेकळे यांनी केले.

             जत येथील राजे रामराव महाविद्यालयात  अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत राजशास्त्र विभागाकडून आयोजित 'लोकशाही,निवडणुका व प्रशासन ' या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.सी.वाय.मानेपाटील हे होते.
         आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रा.सी.वाय.मानेपाटील म्हणाले कि, कोणत्याही संस्थांबद्दल नागरिकांना आपलेपणा वाटत नाही, तोपर्यंत देशात खरी लोकशाही नांदते असे म्हणता येणार नाही. लोकशाही व सुशासन या परिप्रेक्ष्यात छात्रपती शिवाजी महाराज हे आदर्शवत राजे होते. तसे आदर्श राज्य निर्माण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत   स्वातंत्र पोहचले पाहिजे. आजही समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या सोयी-सुविधा पोहलेल्या नाहीत. त्याच्यांत जागृती करुन त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले पाहिजे, असेही ते शेवटी म्हणाले.
        प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात डॉ. बी.एम. डहाळके यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन प्रा.सतीशकुमार पडोळकर यांनी केले तर आभार अग्रणी महाविद्यालय योजना विभागाचे समन्वयक प्रा.एच.डी.टोंगारे यांनी केले. या कार्यशाळेसाठी प्रा.तुकाराम सन्नके, प्रा.प्रवीणसिंह शिलेदार, प्रा.पी.जे चौधरी हे उपस्थीत होते.त्याचबरोबर कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment